हिरकणी महोत्सव’ च्या माध्यमातून धाराशिवच्या महिलांना रोजगाराची संधी मिळाली – अर्चना पाटील

– 708 गटांना मिळाले 7 कोटी 76 लाखांचे कर्ज

धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केलीय. पुण्यातील भीमथडी, मुंबईतील महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर धाराशिवमधील माता भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना, त्यांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हिरकणी महोत्सवात हक्काची बाजारपेठ आपण उपलब्ध करून त्दिली असून याच महोत्सवाच्या जोरावर धाराशिव मधील 708 अल्पबचत गटांना तब्बल 7 कोटी 76 लाख रुपयांचे कर्ज मिळाल्याची माहिती अर्चना पाटील यांनी दिली. 

या विषयी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेल्या “Vocal For Local” या संकल्पनेची या महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. उत्कृष्ट दर्जा आणि गुणवत्ता दिल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वस्तूंची मागणी करतात त्यामुळे सहभागी विक्रेत्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. धाराशिवच्या जनतेला स्थानिक पातळीवर बनविलेले उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आणि पदार्थ उपलब्ध होऊ लागले आहेत.  दरवर्षी या ठिकाणी महिला बचत गट व माता-भगिनींच्या माध्यमातून शेकडो स्टॉल लावले जातात. आर्थिक सक्षमीकरणासह सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन या निमित्ताने केले जाते..

यंदा जानेवारी-२०२४ मध्ये झालेल्या महोत्सवात लेडीज क्लबच्या प्रांगणात विविध वस्तूंचे १५० स्टॉल्स मांडण्यात आले. महिलांसाठी उद्योजकीय, सांस्कृतिक, मनोरंजन, गीत रामायण यासारखे कार्यक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील PMEGP व CMEGP च्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेल्या यशस्वी हिरकण्यांचा सन्मानही करण्यात आला.. स्वयंरोजगारासाठी बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यासाठी लेडीज क्लबच्या वतीने मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. महिला बचत गटांच्या वेगवेगळ्या उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनासाठी भीमथडी जत्रा तसेच इतर प्रदर्शनात त्याची विक्री करणे, मार्केटिंग शिकवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. एकंदरीतच हा उपक्रम अत्यंत लोकप्रिय ठरला असून कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या हिरकणी महोत्सवातून अनेक माता-भगिनींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा नवा मार्ग मिळाला आहे.. महिला सक्षमच आहेत, त्यांना संधी देणे हे माझे कर्तव्य आहे, असे पाटील म्हणाल्या.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version