धाराशिव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गाचा प्रश्न आपले हक्काचे महायुती सरकार येताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागला आहे. सदर रेल्वे मार्गामध्ये वडगाव येथे थांबा असल्याने गावकर्यांची मोठी सोय होणार आहे. असे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
वडगाव (सि), पोहनेर, आंबेजवळगे येथे कॉर्नर बैठका घेऊन अर्चना पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.. आंबेजवळगे येथील श्री रेणुकादेवी मंदिर व कौडगाव येथील पावणारा मारुती मंदिरात दर्शन घेतले..
पुढे बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून कौडगाव येथे एमआयडीसी साकारली असून येत्या काळात मोठे उद्योग या ठिकाणी येतील. त्यांच्या माध्यमातून कौडगाव, आंबेजवळगे परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. केंद्रात ‘फिर एक बार मोदी सरकार’च येणार आहे. त्यामुळे आपल्या लोकसभेचा खासदार देखील महायुतीचाच असायला हवा, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात निधी मिळणे शक्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला ‘अबकी बार ४०० पार’चा नारा सार्थ ठरविण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून जनसेवेसाठी लोकसभेत संधी द्यावी असे आवाहन पाटील यांनी केले.
याप्रसंगी दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील यांनी मतदारांना मार्गदर्शन करत देशाची सूत्रे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देण्यासाठी घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, दत्ता देशमुख,प्रमोद पाटील,अनंत कुलकर्णी,प्रमोद पवार,अनिल शिंदे,ओम नाईकवाडी,बालाजी जाधव,अतुल देशमुख,अमोल जाधव,महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.