धाराशिव : महायुतीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांची कसबे तडवळे येथे प्रचार सभा संपन्न झाली.. या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी घड्याळाचा गजर करून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. महायुतीला सर्वच गावांमध्ये प्रचंड पाठबळ मिळत आहे.
कसबे तडवळे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४१ साली ऐतिहासिक महार-मांग-वतनदार परिषद घेतली होती. ज्या ठिकाणी ही परिषद झाली, त्या ठिकाणी स्मारक व्हावे यासाठी आमदार राणादादांचा पाठपुरावा सुरू आहे.. रेल्वे थांबा व्हावा ही गावकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी आहे. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी महायुतीचा खासदारच येणे गरजेचे आहे असे अर्चना पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरपूर निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. यातून अनेक कामे पूर्ण झाली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब पुन्हा एकदा सत्तेवर येणार असून आपला खासदार देखील महायुतीचाच असायला हवा. यामुळे केंद्रातील योजना, निधी आपल्या गावात खेचून आणण्यासाठी मदत होणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी मतदारांना मार्गदर्शन करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी नाना वाघ, .सुधीर करंजकर, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
दरम्यान, सोलापूर येथे अर्चना पाटील यांनी श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठ यांचे आशीर्वाद घेतले..
तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथ, उज्जैन, वाराणसी याप्रमाणेच तीर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास आणि आपल्या संपूर्ण परिसराचा विकास आणि कायापालट करण्याचा संकल्प श्री महाराजांसमोर त्यांनी बोलून दाखविला..आमदार राणादादांनी अत्यंत तळमळीने केलेल्या कार्यामुळे सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून महायुतीचा निश्चितच विजय होईल असा आशीर्वाद महाराजांनी दिला..
श्री १०८ चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी होटगी मठ, सोलापूर येथे झालेली ही भेट अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली अशी भावना अर्चना पाटील यांनी व्यक्त केली.
कसबे तडवळे येथे डॉ. आंबेडकर स्मारक, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महायुतीचाच खासदार हवा – अर्चना पाटील
Leave a comment