अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ – सुरेश बिराजदार 

धाराशिव : महायुती च्या जागा वाटपात धाराशिव लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे आला आहे, निवडणुकीच्या तयारीला लागा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  खरंतर आपल्या पक्षाचा ना आमदार, ना खासदार ना टेबलला खुर्ची असं असताना देखील मी खूप फिरलो त्यातून एक चांगलं वातावरण निर्माण झालं लोकांच्या भावना कळल्या जनमत तयार व्हायला मत झालं मात्र जेव्हा महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा उमेदवार बदलला गेला, आम्ही सांगितलं काही हरकत नाही दादा आपण ज्या जागेसाठी तयारी केली होती तीच तयारी कामी येईल.  आता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केला. 

पुढे बोलताना सुरेश बिराजदार म्हणाले,  अजित पवारांनी सांगितलं होतं की सुरेशराव आपल्यासाठी मी धाराशिव मतदार संघ घेणार आहे.  तुम्ही निवडणुकीची तयारी करा खरंतर आपल्या पक्षाचा ना आमदार, ना खासदार, ना टेबलला खुर्ची असं असताना देखील मी खूप फिरलो, त्यातून एक चांगलं वातावरण निर्माण झालं.  लोकांच्या भावना कळल्या जनमत तयार व्हायला मत झालं मात्र जेव्हा महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा उमेदवार बदलला गेला आणि अजित दादांनी आम्हा सर्वांना बोलावून सांगितलं की सुरेश आपल्याला अर्चनाताईंना उमेदवारी द्यायची आहे.  आम्ही सांगितलं काही हरकत नाही दादा आपण ज्या जागेसाठी तयारी केली होती तीच तयारी कामी येईल आणि अर्चना ताई साठी काम करू, दादांनीच निवडणुकीची तयारी करायला सांगितली आणि दादांनीच उमेदवारी दुसऱ्याला देऊन काम करायला सांगितला ,शेवटी दादांचा आदेश आहे.  तो मानायचा अजित दादांचं नेतृत्व आता महाराष्ट्राला हवा आहे त्यांनी बोलल्यानंतर काम व्हायलाच पाहिजे अर्चनाताईंना एक लाखापेक्षा लीड मिळणार नाही, आम्ही काम करतो शेजारच्या औसा मध्ये देखील खूप चांगले वातावरण आहे त्यांचा ऊस आमच्या साखर कारखान्यांना येतो तेथे सुद्धा अभिमन्यू पवार, बसवराज पाटील साहेब आहेत.  तिथे राणादादांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी सुरज बिराजदार यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन केलं त्या सुरज बिराजदार आणि त्यांच्या  संचालक मंडळाने  हा साखर कारखाना परत एकदा सुरू केला, राणा दादांचे पुण्य या शेतकऱ्यांच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे, असेही बिराजदार म्हणाले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version