तुला जी हुजरेगिरी करायची ती राहुल गांधी समोर कर-मल्हार पाटील

धाराशिव बाणगंगा टाइम्स वृत्तसेवा-

जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो, तो आपल्या अस्मितेचा,आपल्या धर्माचा विषय आहे. हा विरोधातील माजी खासदार आपल्या देवाची टिंगल करतो. पण मी त्याला सांगू इच्छितो की, माझ्या देवा,धर्माबद्दल काही बोलायचं नाही. तुला जी काही हुजरेगिरी करायची आहे ती त्या राहुल गांधी समोर कर असा सल्ला मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा मल्हार पाटील हे मैदानात उतरले आहेत. होर्टी गावात प्रचार सभेत ते बोलत होते.
मल्हार पाटील म्हणाले, होर्टी गाव हा देव धर्म मानणारा गाव आहे. पण ओमराजे निंबाळकर म्हणतात ‘जय श्री राम’ म्हणून लागते का नोकरी? अरे भगवान श्री राम आमच्या हृदयात आहेत. तू कोणाला जॅक देऊन, टॉमी देऊन लागली का नोकरी?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच ज्या कारसेवकांनी, राम भक्तांनी राम मंदिरासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आठवून तुमच्या डोळ्यात जे आश्रु आले ते मतदान करताना विसरू नका, असे आवाहन मल्हार पाटील यांनी धाराशिव येथील मतदारांना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पूर्वी काँग्रेसवाले आमची टिंगल टवाळी करायचे. हे कसले रामाचं मंदिर बांधणार असे म्हणायचे. पण आमच्या वाघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य राम मंदिर बांधून दाखवलं.
विरोधी प्रतिस्पर्धी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना मल्हार पाटील पुढे म्हणाले, 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे निवडून आले. अन् आता म्हणतात नरेंद्र मोदी म्हणजे कोण?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version