डॉ.पद्मसिंह पाटील यांनी किल्लारी भूकंपात केलेले कार्य न विसरता येण्याजोगे- आ.ज्ञानराज चौगुले

धाराशिव बाणगंगा टाइम्स

लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान उमरगा तालुक्यातील तुरोरी, कराळी परिसरातील निसर्गरम्य अचलबेट देवस्थान येथे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने सत्कार केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने केले.. 

नाईचाकूर, नारंगवाडी, कवठा, राजेगाव येथे प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेऊन अर्चना पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.. नारंगवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, डॉ.पद्मसिंह पाटील आणि या भागाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. किल्लारी भूकंप काळात साहेबांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे. पाटबंधारे मंत्री असताना साहेबांनी या भागात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव आणि सिंचनाच्या अनेक योजना राबवून हा भाग सुजलाम सुफलाम केला आहे.. साहेब खासदार असताना या मतदार संघातील ७०% पेक्षा जास्त गावांना खासदार निधी दिलेला आहे. त्यामानाने आजच्या खासदाराने किती निधी दिला हा संशोधनाचा भाग आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद उपाध्यक्षा असताना शाळा, तीर्थक्षेत्र, रस्ते, आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. या भागात आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी आपल्या हक्काच्या महायुतीला साथ द्यावी असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले..

श्री क्षेत्र कल्लेश्वर देवस्थान, कलदेव निंबाळा येथे यात्रेनिमित्त अर्चना पाटील यांनी दर्शन घेतले. भाविकांसोबत संवाद साधून महाप्रसाद घेतला..देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन पाटील यांनी या  निमित्ताने केले..
यावेळी याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, अभय चालुक्य,  दिलीपसिंग गौतम, आकांक्षा चौगुले यांनी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारास आपले अमूल्य मत द्यावे असे आवाहन केले..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version