मल्हार पाटील यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत ओमराजेंचा घेतला समाचार

धाराशिव बाणगंगा टाइम्स –लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वेग धरू लागला आहे. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मिळणारा प्रतिसाद विरोधकांना धडकी भरवत असल्याचे दिसते यातून विरोधक बेछूट आरोप करत सुटले असल्याचे दिसते मात्र विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना युवा नेते मल्हार पाटील यांनी थेट ‘लाव रे तो व्हिडिओ..’ म्हणत विरोधकांचा भांडाफोड केला आहे. 

धारशिव लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना फॉर्म भरण्याच्या दिवशी आशिर्वाद द्यायला आलेला अलोट जनसमुदाय पाहून विरोधकांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे धाबेच दणाणले होते.  यामुळे आलेली गर्दी कशी स्वतःहून आलेली नव्हती हे दाखविण्यासाठी त्यांनी काही लोकांच्या खोट्या बाईट्स घेतल्या. त्याच लोकांना शोधून मल्हार पाटील यांनी सत्य जाणते समोर आणले.लोकसभेचा फॉर्म भरताना झालेली गर्दी बघून विरोधकांनी असा आरोप केला होता की, जी अलोट गर्दी स्वतःहून आलेली होती ती भाडोत्री किंवा पैसे देऊन आणलेली होती त्या आरोपाचा खरपूस समाचार घेत मल्हार पाटलांनी थेट व्हिडिओच्या माध्यमातूनच ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ केलं. 

मल्हार पाटील म्हणाले, जी लोकं पैसे देऊन आणली होती असा आरोप झाला मी त्याच लोकांना शोधून काढलं. आणि आमच्या माणसांनी जाऊन त्यांना विचारलं की तुम्हाला आम्ही किती पैसे दिले होते? किंवा तुम्हाला पैसे देऊन आणलं होतं का? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की,विरोधकांनी तुम्ही रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला पैसे देऊन यायला लावलं असे बाईट द्या हे सांगण्यासाठी आम्हाला पैसे  मिळाले होते असे स्पष्ट करत आम्ही त्या रॅलीमध्ये सहभागी झालो आणि तसे बाईट दिल्याचे सांगितले.मल्हार पाटलांनी भर सभेमध्ये त्या लोकांचा व्हिडिओ जनतेला दाखवले. 

सामान्य लोकांना पैसे चारून विरोधकांनी अर्चनाताईंवर चुकीचे आरोप करून आपली स्थिती दाखवली आहे.फॉर्म भरण्यासाठीच्या निमित्ताने झालेल्या  विराट रॅली च्या दिवशीचं विरोधकांना आपला पराभव दिसला असल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version