सुनेला परकी म्हणणाऱ्यांच्या विरोधात मतदान करून धाराशिवच्या लेकीच्या अपमानाचा बदला घ्या -धनंजय मुंडे

तुळजापूर बाणगंगा टाइम्स –

काही लोक सुनेला परकी म्हणतात. त्यामुळे आपल्या सुनेला मतदान करून धाराशिवच्या लेकीच्या अपमानाचा बदला घ्या. सुनेला परकी म्हणणाऱ्या लोकांना हद्दपार करा असे आवाहन मुंडे यांनी धाराशिवच्या जनतेला केले.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार  सभेत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करीत विरोधकांचा समाचार घेतला.

धनंजय मुंडे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत दिलं होतं आणि त्याच्यानंतर जे काही झालं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्राचं सर्वात मोठ नुकसान त्यामुळे झालं. गेल्या अडीच वर्षापासून राज्यात ठाकरे सरकार होते त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये आई तुळजाभवानीचा उल्लेख असतो मात्र जेव्हा तुळजापूरच्या विकास प्रस्तावाची गोष्ट आली. तेव्हा राज्य सरकारकडून कोणतीही पाऊल उचलण्यात आली नाही.  याउलट महायुतीच्या सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या आत तुळजापूरला विकास निधी देण्यात आला. याचा आशिर्वाद आई तुळजाभवानी अर्चनाताईंना दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा 2014 मध्ये येथे प्रचाराला आले होते तेव्हा तुळजापूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लावू असे बोलले होते. मात्र विद्यमान खासदाराकडून दहा वर्षात एकाही ओळीचा प्रस्ताव किंवा पत्र केंद्राला या संदर्भात पाठवण्यात आलेलं नाही खरंतर ही त्यांची जबाबदारी होती. एवढेच काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या रेल्वेसाठी एकही रुपयांचा निधी देण्यात आलेला नाही. आई भवानीच्या साक्षीनं ज्यांनी ज्यांनी हा खोटारडेपणा केला त्यांना आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही.

देशात इंडी नावाची एक आघाडी तयार झाली आहे.  त्याच्यामध्ये केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नये, म्हणून काम करत आहे. भाजप देशभरामध्ये सर्व जागा लढवत आहे. तर विरोधात असलेले काँग्रेस संपूर्ण भारतात केवळ 240 जागा लढवत आहे. भाजपमध्ये आज आपकी बार 400 पार तर काँग्रेस म्हणत आहे आपकी बार जमलं तर पचास के पार. पण जनतेने ठरवले तर ‘अब की बार 400 पार आणि विरोधक बाउंड्री पार’ होवू शकेल, असा आशावादही धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version