तुळजापूर शक्तिपीठ एक्स्प्रेसने जोडणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी

धाराशिव बाणगंगा टाइम्स –

ही निवडणूक भारताच्या स्वाभिमानाची आहे. तुम्ही मागील 10 वर्ष पाहिली आहेत. जगाला आज तो भारत माहिती आहे. जो वेगाने विकास करत आहे. चंद्रयानची यशस्वी प्रक्षेपण, गगनयान जो पाठवण्याच्या तयारीत आहे, ज्याने कोरोनाची लस बनवली.आधी असं कधी होत होत का?  जी सरकार होती कमजोर सरकार आहे मजबूत देश कसा बनवू शकेल. आज भारत जगाला मदत करतो भीक मागत नाही. विश्वासघात ही कॉँग्रेसची ओळख आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत पंतप्रधान बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत आमदार राणाजगजितसिंग पाटील,आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीने  शिवरायांना विजयासाठी आशीर्वाद दिला होता. त्याप्रमाणे मी सुद्धा तुळजाभावानीचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असा मराठीमध्ये संवाद साधत पंतप्रधानांनी भाषणाला सुरूवात केली.

काँग्रेसने मराठवाड्यांच पाणी रोखलं 

काँग्रेस 60 वर्ष सत्तेत होती मात्र आम्ही जे काम 10 वर्षात केले ते काँग्रेस या 60 वर्षात करू शकली नाही. ती मराठवाड्यात पाणी नाही पोहचवू शकली. जलयुक्त शिवार योजनेला यांनीच रोखलं. पण मोदी समस्या टाळत नाही तर समस्येला भिडतो. मागील पाच वर्षात मोदी सरकारने पाच लाख घरात नळाद्वारे पाणी पोहचवले आहे.

काँग्रेसचे मनसुबे देशाला हानिकारक

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक शेतकऱ्यांसाठी मोठ मोठ्या बाता करतात. मात्र सत्ता काळात काँग्रेसने शेतकऱ्यांना काहीही दिली नाही. आता शेतकऱ्यांना केवळ मदत करण्याची नाही तर आत्मनिर्भर बनवण्याची वेळ आहे. गरिबांच्या वाट्याला आलेला पैसा काँग्रेसच्या पंज्याने हिरावून घेतला. पण आता मोदी सरकार शेतकऱ्यांनी बनवलेले धान्य जगभरात निर्यात करता येणार आहे. काँग्रेसने पक्ष आता पूर्णपणे कंगाल झालेला पक्ष आहे. स्वतः काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात बहुमतासाठी आवश्यक 272 जागा लढवत नाहीय. मग ते सत्तेत कसे येणार? या फेक व्हिडिओ आणि खोट्याच दुकान चालवणाऱ्या काँग्रेसने खात आता बंद व्हायला पाहिजे.कारण काँग्रेस
आता सत्तेत आल्यास मोठा कर लावणार आहे. काँग्रेसचे मनसुबे देशाला हानिकारक आहेत.

तुळजापूर शक्तीपिठ एक्सप्रेसने जोडणार 

मोदी म्हणाले, तुळजापूरच्या विकासासाठी महायुतीची सरकार पूर्ण भक्तीभावाने काम करत आहे. हे मंदिर संभाजीनगर हायवेला जोडण्यात आले आहे. पूर्वी धाराशिव पासून फक्त एक रेल्वे जात होती. मात्र आता त्यांची संख्या वाढली आहे. तुळजापूर मंदिराला शक्तीपीठ एक्स्प्रेसने सुद्धा जोडले जाणार आहे. लातूर – टेंभुर्णी महामार्ग बनवण्याचे काम सुरू आहे. सोलापूर – तुळजापूर – धाराशिव रेल्वे देखील लवकरच पूर्ण होईल. तुमच्या एका ॲक्शनने येथे मोठ जंक्शन येथे बनेल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अर्चना पाटील यांना  विजयी करा असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version