त्या सभेतील व्हिडिओवर वरून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना क्लीनचिट

धाराशिव बाणगंगा टाइम्स –

राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी १९ एप्रिल रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह महायुतीचे आठ आमदार उपस्थित होते.

यावेळी किमान २० हजार लोक रॅलीत सहभागी झाले होते. ही गर्दी अर्चना पाटील यांचे पती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पैसे देऊन जमवल्याचा आरोप करीत विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तसेच सोबत ४ ते ५ व्हिडीओ जोडले होते. तसेच खासदार ओमराजे यांनी अनेक सभेत ते व्हिडीओ लावून , आ. राणा पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केला होता.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ओमराजेच्या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी सर्व व्हिडीओ सायबर पोलिसांना पाठवले होते. त्याची पोलिसांनी पडताळणी केली असता, सर्व व्हिडीओ खोटे आणि एडिटेड असल्याचा अहवाल पाठवल आहे. तसेच सर्व व्हिडीओ जाणीवपूर्वक रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे. या लोकेशन सापडत नाही तसेच व्हिडीओमधील व्यक्ती कोणत्या गावाचे आहेत हे देखील सिद्ध झालेले नाही.

सायबर पोलिसांच्या अहवालावरून , जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी खासदार ओमराजे यांची तक्रार खोटी ठरवत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील क्लीन चिट दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version