धाराशिव बाणगंगा टाइम्स –
लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महायुतीच्या धाराशिवच्या उमेदवार यांच्या प्रचाराची सांगता रविवारी झाली. देशाच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणे आवश्यक आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होत आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी महायुतीला साथ देवून प्रचंड मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केले.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पाटील यांनी भूम तालुक्यातील वालवड, पाथरूड व कळंब तालुक्यातील वाटवडा येथे सभा व बैठका घेवून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटातील कार्यकत्यांनी महायुतीमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, १८ वर्ष सामाजिक क्षेत्रात आणि १२ वर्ष राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना आपले आशीर्वाद हीच सातत्यपूर्ण कार्याची ऊर्जा राहिली आहे. राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी आपल्या धाराशिव लोकसभा क्षेत्राचा हातभार लागावा आणि केंद्रातील विकासाची गंगा आपल्या क्षेत्रात प्रवाहित करता यावी, यासाठी आपले पाठबळ आवश्यक आहे. आपला आशीर्वाद मिळावा ही प्रार्थना! लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन पाटील यांनी केले..