महायुतीचा आपल्या हक्काचा खासदार असेल तर.. मल्हार पाटलांचं मोठं विधान

bangangatimes.com

धाराशिव : आपल्या सरकारच्या माध्यमातून राणादादांनी आपल्या गावांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. महायुतीचा आपल्या हक्काचा खासदार असेल तर केंद्रातून अधिक मोठ्या प्रमाणात निधी आणणे आपल्याला शक्य होईल. गेल्या १० वर्षाच्या विकासाची प्रचंड गती पाहता पुन्हा एकदा मोदी सरकार येणे गरजेचे असल्याचे विधान मल्हार पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत मल्हार पाटील बोलत होते.

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापुर तीर्थक्षेत्र विकास कौडगाव एमआयडीसी अशा असंख्य प्रकल्पांमधून संपुर्ण धाराशिव जिल्हाचा कायापालट करण्यासाठी राणआदादा आणि अर्चनाताी अखंड प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महायुतीच्या उमेदवारालाच मत देऊन प्रंचड मताधिक्याने विजयी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

त्याआधी मल्हार पाटील धाराशिव मतदारसंघातील बामणी, ताकविकी, तोरंबा, करजखेडा याठिकाणी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. यातच यावेळी ते म्हणाले की, राणादादांनी जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प आणले आहे. त्याचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचत आहे.. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिक घेत आहेत. त्यातून आपले धाराशिव ‘आत्मनिर्भर’ जिल्हा म्हणून पुढे येत आहे.

दरम्यान, निधीचा ओघ आणखी वाढवण्यासाठी आणि गतिमान विकासासाठी महायुतीचा खासदार निवडून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले..

TAGGED:
Share This Article
Leave a comment