उमरगा-लोहा-याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टिका

bangangatimes.com

उमरगा बाणगंगा टाइम्स –

धारशिव लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चौगुले बोलत होते. 

पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले, जेव्हा  तिकीट वाटपावरून चर्चा सुरू होती तेव्हा येथील आपल्या जिल्ह्याचे विद्यमान  खासदार आपणच श्रेष्ठ असल्याचे समजत होते, याचं उदाहरण द्यायचं झालं तर शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीच्या रणांगणात हा एकटाच पळत सुटला निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी डिक्लेअर व्हायची होती, त्याच्या आधीच हा पळत सुटला आणि मी जिंकलो म्हणू लागला तो एक नंबरचा ठग माणूस आहे, या ठगाला हाकलून येण्याची संधी आपल्याला आता मिळाली आहे. कोणी नसताना मी पहिला आलोय हे म्हणणं सोपं असतं, पण आता रणांगणात आमचा उमेदवार उभा आहे.  आता जिंकून दाखव असा आव्हान चौगुले यांनी दिले. 

मी त्या उमेदवाराबरोबर काम केलेलं आहे.  हा अधिकारी लोकांना फोन करतो आणि काहीही बोलतो,  मी अनेकदा त्याला सांगितलं असं करणे योग्य नाही,  पण नेता म्हटलं की असं करावंच लागतं असं तो सांगतो तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तू ही सवय बदलून टाक नाहीतर पुढच्या काळात तो सभागृहाचा नेता राहणार नाही आणि तसंच झालं. 

एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपण जेंव्हा प्रचाराला लोकांमध्ये  जाऊ त्यावेळी  प्रत्येकाला आपण हे पटवून दिले पाहिजे की, आपण आपला सर्वोच्च नेता निवडण्यासाठी बहुमूल्य असं आपलं मत अर्चना पाटील यांना दिले पाहिजे.  चार-पाच महिन्यापूर्वी आपल्याला उजनीच 60 टीएमसी पाणी मंजूर झालं होतं,  572 कोटीचा टेंडर झालं होतं आपला पाण्याचा प्रश्न,  विजेचा प्रश्न या निधीने सुटणार आहे.  केंद्राचा निधी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण होणार आहे त्यासाठी विकासाचा विचार करणारा खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे म्हणून आपण अर्चना ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन चौगुले यांनी केले.

Share This Article
Leave a comment