दत्ता वाघमारे कुटुंबीयांची देखील घेतली भेट
धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. यापूर्वी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या गोळीबारात आंदोलक दत्ता वाघमारे जखमी झाले होते, त्यांच्यावर सर्व उपचार महायुतीच्या लोकसभा उमेदवार अर्चना पाटील यांच्या कुटुंबीयांनी केले, आज वाघमारे कुटुंबीयांनी अर्चना ताईंची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अर्चना पाटील यांनी कळंब तालुक्यातील सातेफळ येथे नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. गावकऱ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात कॉर्नर सभा संपन्न झाली.. याच गावातील मराठा आंदोलन दत्ता वाघमारे यांच्यावर २०१७ साली गोळीबार झाला होता, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करुन घेण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत कुटुंबातील सदस्याप्रमाणे संपूर्ण पाटील कुटुंबीयांनी काळजी घेऊन त्यांचा जीव वाचवला. आज संपूर्ण वाघमारे कुटुंबीयांनी अर्चना पाटील यांच्या बैठक स्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ‘घड्याळ’ चिन्हाला मत म्हणजे विकासाला मत हे ओळखून उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन केले त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, रामहरी शिंदे, मदन बारकुल, प्रणव चव्हाण, धनंजय वाघमारे यांच्यासह महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.