धाराशिव येथे 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

bangangatimes.com

धाराशिव बाणगंगा टाइम्स –

राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तिसऱ्या टप्यात मतदान असलेल्या लोकसभा मतदार संघाकडे आता राष्ट्रीय नेत्यांचे लक्ष लागले असून या टप्प्यात मराठवाड्यातील फक्त धाराशिव या एकाच मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या लोकसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत  होत आहे. या मतदारसंघात  महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 30 एप्रिल रोजी होणार आहे. 

लोकसभेच्या दुसऱ्या टप्यात मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघांचा समावेश आहे. तर तिसऱ्या टप्यात मराठवाड्यातून फक्त धाराशिव मध्ये मतदान होणार आहे. तर उर्वरित बीड, जालना, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये चौथ्या टप्यात मतदान आहे. 

धारशिव मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आहेत,  त्यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उबाठा कडून मैदानात आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीतून अर्चना पाटील यांचे पारडे या निवडणूकीत जड झाल्याचे दिसते आहे.त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 एप्रिल रोजी   सकाळी 11 वा, धारशिवमध्ये तुळजापूर रोड वरील मैदानावर प्रचार सभा घेणार असल्याने त्याचा फायदा अर्चना पाटील यांना निश्चित होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती युवा नेते मल्हार पाटील यांनी दिली.

Share This Article
Leave a comment