धाराशिव बाणगंगा टाइम्स-
30 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्याकरिता एक मोठी सभा घेणार आहेत. या सभेची उत्सुकता धाराशिवरांना लागून राहिली आहे.
धाराशिव येथे ते नरेंद्र मोदी प्रथमच येत असल्यामुळे धाराशिव येथील महिला, तरुण व ज्येष्ठ मंडळींमध्ये देखील उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांच्या या सभेमुळे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पारडं जड होईल अशी देखील चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. आतापर्यंत अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत व महायुतीच्या सर्व आमदार यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असल्यामुळे या दौऱ्याविषयी सर्वसामान्य धाराशिवरांना उत्सुकता लागून राहिली आहे.