धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जोरदार हाबाडा, अनेकांनी केला  आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

bangangatimes.com

धाराशिव बाणगंगा टाइम्स

धाराशिव लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात धाराशिव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.  काल या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडली. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेवलेल्या या महत्वपूर्ण मतदारसंघात महायुतीने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या  कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत धाराशिव तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, विविध गावांतील सरपंच,उपसरपंच,सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. 

 भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष  रोहित पडवळ, काजळाचे माजी पं.स.सदस्य  आश्रुबा माळी,समुद्रवाणी येथील अशोक शिंदे, बलभीम जाधव, दारफळ येथील सरपंच रवींद्र जाधव, वरुडाचे सरपंच खंडेराव गाढवे, केशेगावचे सरपंच अभिजित पाटील, देवळालीचे संतोष गायकवाड, मेडसिंगाचे उपसरपंच  किशोर आगळे, आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक सुग्रीव कांबळे, पाटोदाचे युवराज परतापुरे, कौडगावचे (बावी) आकाश कदम, तेर येथील शिवाजी तात्या चौगुले, महाळंगीचे  बालाजी ढवळे, नांदुर्गाचे अंगद पवार, करजखेडाचे  बालाजी आदटराव, विठ्ठलवाडीचे नानाजी लांडगे, बरमगावचे राम पवार, इर्लाचे  हारून पटेल, जहागीरदार वाडीचे  विक्रम चव्हाण, तोरंबाचे बहादूर तांबोळी, सांगवीचे राजकुमार बचाटे, कोल्हे गावचे बालाजी धायगुडे, वाघोलीचे  मुकुंद पाटील, लासोनाचे राजेश सुतार यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या सर्वांचे भाजपा मध्ये स्वागत करून  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुभेच्छा दिल्या..

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, डॉ.पद्मसिंहजी पाटील  आणि  मधुकरराव चव्हाण  यांनी जनतेसाठी केलेले काम सर्वांना माहिती आहेच. आपल्याला देखील असेच प्रामाणिक काम करायचे आहे. कार्यकर्त्यांनी एकजुटीने व एकमेकांवर विश्वास ठेऊन काम करावे. जिल्ह्यात मोठे प्रकल्प, योजना आणायच्या असून यासाठी आपली खंबीर साथ असायला हवी आहे. प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी यापुढे निश्चिंत रहावे‌.सुनील चव्हाण हे मालक म्हणून तर आपण पालक म्हणून पक्षात आपली काळजी घेणार आहोत.
प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातून महायुतीच्या उमेदवार  अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.. यावेळी  सुनील चव्हाण, ज्येष्ठ नेते  सुरेशभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष  मधुकरराव तावडे, माजी नगराध्यक्ष  संपतराव डोके,युवराज नळे, दर्शन कोळगे,प्रल्हाद धत्तुरे,पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment